ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
याचा अर्थ महिलेला केवळ कर्जाची मुद्दल रक्कम भरावी लागणार आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
व्याज परतावा जमा करणच्या खालील तीन कंडीशन आहेत.
पूर्ण कर्ज फेड होईपर्यंत व्याजाची रक्कम १२ टक्के च्या मर्यादेत बँकेत जमा केली जाते.
७ वर्षे कालावधीसाठी योजना राबविली जाते.
जास्तीत जास्त ४.५० लाख रुपये व्याज शासन भरू शकते.
बॅंक खात्यात पूर्णपणे कर्जाची परतफेड किंवा ७ वर्षे कालावधीपर्यंत किंवा व्याजाचे रक्कम ४.५० लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत या तीन पर्यायांपैकी जो आधी घडेल तोपर्यंत दरमहा व्याज जमा करण्यात येते.महिलांचा पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असला पाहिजे.
पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असला पाहिजे.
या हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये 50% व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे.
महिलांच्या मालकीच्या टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये देखील 50% महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे.
पर्यटन व्यवसायासाठी ज्या परवानग्या आवश्यक असतात त्या सर्व त्या सर्व असणे बंधनकारक आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे कर्जाचे हफ्ते वेळेत भरलेले असावेत.
होम स्टे / लॉज / रिसॉर्ट / निवास व न्याहारी सुविधा.
हॉटेल, उपहारगृह, फास्ट फूड, बेकरी, महिला कॉमन किचन.
टूर अँड ट्रॅव्हल एजन्सी, ट्रान्सपोर्ट, गाईडिंग, क्रूझ सेवा.
साहसी पर्यटन (जल, थरार, गिरिभ्रमण).
आदिवासी, निसर्ग, कृषी पर्यटन प्रकल्प.
आयुर्वेद व योगा आधारित वेलनेस सेंटर.
हस्तकला विक्री केंद्र, स्मरणिका शॉप्स.
कॅरव्हॅन, हाऊस बोट, टेंट, ट्री हाऊस, पॉड्स.
महिलांनी चालवलेले कॅफे, पर्यटन माहिती केंद्रे, टुरिस्ट हेल्प डेस्क इत्यादी.
वरील व्यवसाय आई योजना अंतर्गत महिलांना करता येतात.
सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड/पासपोर्ट/मतदार ओळखपत्र.
व्यवसाय नोंदणी वीज बिल/ दूरध्वनी बिल / महाराष्ट्र दुकाने आस्थापना नोंदणी प्रमाणपत्र.
व्यवसाय मालकीचे प्रतिज्ञापत्र (₹१०० स्टॅम्पवर)व्यवसाय कर्ज मार्गदर्शन
अन्न व औषध परवाना (खाद्य व्यवसायासाठी)
प्रकल्प संकल्पना (५०० शब्दांमध्ये)
₹५० चलन https://gras.mahakosh.gov.in/ वर भरून त्याची प्रिंट सोबत जोडावी.
https://nidhi.tourism.gov.in/ या पोर्टलवर नोंदणीचे पुरावे (जर उपलब्ध असतील)
आई योजनेच्या अटी व शर्थी
महिलांना आई कर्ज योजनेचा लाभ घेता यावा यासाठी काही नियम व अटी घालून देण्यात आलेल्या आहेत त्या खालीलप्रमाणे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
महिला अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावी.
लाभार्थ्याचे बँक खाते आधारशी लिंक असावे.
पर्यटन व्यवसाय महिलेच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा.
पर्यटन व्यवसायात 50% व्यवस्थापकीय मालकी व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे.
बँकेने कर्ज देताना अर्जदाराकडे कोणतेही तारण नसल्यास केंद्र शासनाच्या क्रेडिट गॅरंटी स्कीम मध्ये समाविष्ट करून घेतले जाईल.
महिला अर्जदाराने विहित नमुन्यात ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर त्यांना पर्यटन संचालनालयाकडून पात्रता प्रमाणपत्र Letter of intent दिले जाईल. सदर प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी अधिकृत बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे.
कर्जाची परतफेड नियमित होणे आवश्यक आहे.
व्यवसाय सुरु असल्याचे फोटो सादर करणे अनिवार्य आहे.
व्याज रकमेव्यतिरिक्त इतर कोणतीही Bank fees किंवा चार्जेस पर्यटन संचालनालयाकडून दिले जाणार नाहीत.
योजनेचा सारांश
नि